जाहले धुंडुनिया गोकुळ
जाहले धुंडुनिया गोकुळ
प्राणविसावा माधव कोठे, झाले मी व्याकुळ
सांग मला भ्रमरा तुज भ्रमता, दिसले का मम फूल
किंवा मयुरा तव तालावर पडले का पाऊल
चक्रवाका तुजसी न दिसला पानांवरी तांबुल
कसा विसरशी तूही नकुला गंधित ती पदधूल
प्राणविसावा माधव कोठे, झाले मी व्याकुळ
सांग मला भ्रमरा तुज भ्रमता, दिसले का मम फूल
किंवा मयुरा तव तालावर पडले का पाऊल
चक्रवाका तुजसी न दिसला पानांवरी तांबुल
कसा विसरशी तूही नकुला गंधित ती पदधूल
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | अपर्णा मयेकर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर |
नकुल | - | मुंगूस. |