जाईन विचारित रानफुला
जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथे ग सजण मला !
भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
तरूवेली करतिल गर्द झुला
उंच पुकारिल मोर काननी
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा
वाहत येईल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाईल बुडुन हा प्राण खुळा
भेटेल तिथे ग सजण मला !
भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
तरूवेली करतिल गर्द झुला
उंच पुकारिल मोर काननी
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा
वाहत येईल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाईल बुडुन हा प्राण खुळा
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | किशोरी आमोणकर |
राग | - | सिंधुरा, काफी |
गीत प्रकार | - | भावगीत, ऋतू बरवा |
कानन | - | अरण्य, जंगल. |
पळस | - | पलाश. 'पळस' या झाडाला वसंत ऋतुत लाल-केशरी रंगाची फुले येतात. |