विझले नगरामधले दिवे
विझले नगरामधले दिवे
तुझ्या स्मृतीचा दीप राजसा,
अजुनि नच मालवे
शय्येवरती माझ्या रसिका
फुले अंथरी अथवा कलिका
मंदिर मोडुन लावू काय तरी,
कुसुम लतांचे थवे
तुझे नि माझे होता मीलन
जाई सुगंधे काया भारून
दिधली सुमने तुला दिसावी,
इतुके मजला हवे
तुझ्या स्मृतीचा दीप राजसा,
अजुनि नच मालवे
शय्येवरती माझ्या रसिका
फुले अंथरी अथवा कलिका
मंदिर मोडुन लावू काय तरी,
कुसुम लतांचे थवे
तुझे नि माझे होता मीलन
जाई सुगंधे काया भारून
दिधली सुमने तुला दिसावी,
इतुके मजला हवे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | व्ही. डी. अंभईकर |
स्वर | - | व्ही. डी. अंभईकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
लता (लतिका) | - | वेली. |
सुमन | - | फूल. |