A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जलविहार करी श्रीहरी

जलविहार करी श्रीहरी
कोमल-श्यामल चरण चुंबिती यमुना जल-लहरी

गगनी मेघसा, जळात माधव
अतुल दाखवी लीला-लाघव
मत्त मयुरीपरी नाचती तीरी व्रजनारी, व्रजनारी

कालिंदीचे करुनी दर्पण
निज बिंबा जणु न्याहळी श्रावण
शीरी उन्हाचा झळके मंदिल सुंदर जरतारी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत देसाई
स्वराविष्कार- आशा भोसले
पं. राम मराठे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - बाप माझा ब्रह्मचारी
गीत प्रकार - चित्रगीत
कालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.
मंदिल - जरीचे पागोटे.
लाघव - आर्जव / माया.
व्रज - गवळ्यांची वाडी, समुदाय.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.