जळो रे तुझी होरी
जळो रे तुझी होरी, कान्हा नको करू बळजोरी
मी सासुरवासिनी नारी
आधीच तुजसी उल्लास
अजि आला फाल्गुनमास
पिचकारी उधळी रसरंग, करिती झकझोरी
मी सासुरवासिनी नारी
केली जाळपोळ ती पुरे
फोडिले दुधाचे डेरे
हरिलीस विकल अंतरे
तुझी लगट येइल अंगलट मनाची चोरी
मी सासुरवासिनी नारी
नको टाकू केशरी रंग
भिजले रे चिरचिर अंग
बाई भारीच ग श्रीरंग
लागला जिवाला घोर, संशयी भारी तिकडली स्वारी
मी सासुरवासिनी नारी
मी सासुरवासिनी नारी
आधीच तुजसी उल्लास
अजि आला फाल्गुनमास
पिचकारी उधळी रसरंग, करिती झकझोरी
मी सासुरवासिनी नारी
केली जाळपोळ ती पुरे
फोडिले दुधाचे डेरे
हरिलीस विकल अंतरे
तुझी लगट येइल अंगलट मनाची चोरी
मी सासुरवासिनी नारी
नको टाकू केशरी रंग
भिजले रे चिरचिर अंग
बाई भारीच ग श्रीरंग
लागला जिवाला घोर, संशयी भारी तिकडली स्वारी
मी सासुरवासिनी नारी
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
विकल | - | विव्हल. |