जांभुळपिकल्या झाडाखाली
जांभुळपिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
वेंधळ येडं पाय कुणाचं
झिम्मा फुगडी झालं जी.
समिन्द्राचं भरलं गाणं
उधाणवारं आलं जी
येड्यापिशा भक्तासाठी
पुरतं लागीर झालं जी.
मोडुन गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
चोचीमंधी चोच टाकुनी
दाणं उष्टं झालं जी.
जांभळीच्या झाडाखाली
कोयडं बोऽल बोलं जी
जांभळीचं बन थोडं
पिकून पिवळं झालं जी.
ढोल कुणाचा वाजं जी
वेंधळ येडं पाय कुणाचं
झिम्मा फुगडी झालं जी.
समिन्द्राचं भरलं गाणं
उधाणवारं आलं जी
येड्यापिशा भक्तासाठी
पुरतं लागीर झालं जी.
मोडुन गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
चोचीमंधी चोच टाकुनी
दाणं उष्टं झालं जी.
जांभळीच्या झाडाखाली
कोयडं बोऽल बोलं जी
जांभळीचं बन थोडं
पिकून पिवळं झालं जी.
| गीत | - | ना. धों. महानोर |
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
| स्वर | - | आशा भोसले, रवींद्र साठे |
| चित्रपट | - | जैत रे जैत |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| झिम्मा | - | लहान मुलींचा एक खेळ. |
| लागीर | - | पूर्ण वेडावून जाणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले, रवींद्र साठे