जाणार तू होतीस तर
जाणार तू होतीस तर आलीस का?
मी तुझा नव्हतो तरी माझी प्रिया झालीस का?
हे दु:ख विरहाचे तुझे साहीन मी
माझे खुळे आसू स्वत: पाहीन मी
जळता परि हसते उरी या प्रीतीची ही रीत का?
हे स्वप्न होते एकदा मी पाहिले
ते फूल होते एकदा मी वाहिले
निर्माल्य झाले एकदा ते फूल गे फुलणार का?
ते पूस आसू लाडके नयनांतले
आता पुढे माझे-तुझे जग वेगळे
हृदयातल्या वेड्या खुणा ओठांत तू जपशील का?

गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
गीत प्रकार | - | भावगीत |