A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जन्म दिला मज ज्यांनी

जन्म दिला मज ज्यांनी, घडिले मन-काया
आटली का त्यांची माया?

जये सारिका एक चिमुकली जपली तळहाती,
तेच का पंख तिचे खुडती?

मज आस न दुसरी लाभावा ऋषिवर,
आश्रमी रमावें संसारी सुंदर !
मग स्वर्गहि भुलुनि येईल या भूवर !

पुण्याईने ज्यांच्या लाभे दैवत या हृदया
निमाली त्यांची का छाया?
निमणे - लय पावणे / मरणे.
सारिका - मैना.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.