A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जपून चाल्‌ पोरी जपून

जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌
बघणार्‍या माणसाच्या जिवाचे हाल्‌ !

लाडाने वळून बघायची खोड्‌
नाजुक नखर्‍याला नाही या तोड्‌
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल्‌ !

केसांत सुरंगी रंगात ग
विजेची लव्‌लव्‌ अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल्‌ !

जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल्‌ !

उरात लागलेत नाचाया मोर
कोणाच्या गळ्याला लागेल दोर्‌?
माझ्या या काळजाचा चुकेल ताल्‌ !
सुरंगी - एक प्रकारचे सुगंधी फूल / एक प्रकारच्या अत्तराचे नाव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.