A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जया म्हणती नीचवर्ण

जया म्हणती नीचवर्ण । स्‍त्रीशुद्रादी हीनजन ॥१॥

सर्वांभूतीं देव वसे । नीचा ठायीं काय नसे ॥२॥

नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥

तया नाहीं कां जनन । सवेंचि होत पतन ॥४॥

नीच म्हणोनि काय भुलीं । एका जनार्दनीं देखिली ॥५॥
गीत - संत एकनाथ
संगीत - मा. कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
चित्रपट - धर्मात्‍मा
गीत प्रकार - संतवाणी, चित्रगीत