A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयतु हे स्वतंत्रते

जयतु हे स्वतंत्रते विमुक्त जीविते !
दावि सुभग सगुण रूप, पुरवि वांच्छिते

मंगल हा रजतोत्‍सव
सुधीरांचा गौरव
धन्‍य आज भारतजन न्‍हात अमृते

गर्जा जयजयकारा
व्रत घ्याया असिधारा
कोटि कंठ स्तुतिरव तो नभ निनादिते

हिंददेश ऊर्ध्वमान
खालती झुके न मान
भाग्ययोग आज येत पूर्वसंचिते

हरितक्रान्‍त भूविकास
उद्यमात दैन्यर्‍हास
मुक्त भारतात लोकतंत्र नांदते

प्रहरण रणसज्‍ज क्रान्‍त
शांतिध्वज धरि करात
त्रिदल-बिल्व-वैजयंति कंठि शोभते

कोण छूत अन्‌ अछूत
घालि थैमान भूत
समता ममता जगात नित्‌ नांदते
असिधारा व्रत - अतिशय कठीण व्रत. (असि: - तरवार) धारेवर उभे राहणे.
उद्यम - उद्योग.
प्रहरण - प्रहार, हल्ला / शस्‍त्र, आयुध.
बिल्व - बेलाचे झाड.
रव - आवाज.
वैजयंती - विष्णूच्या गळ्यातली काळी माळ.
वांच्छा - इच्छा.
विमुक्त - मोकळा सुटलेला.
सुधीर - दृढ, खंबीर मनाचा.
सुभग - दैवी / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.