A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जीव तुझा लोभला

जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना
या ऋणाची विस्मृती ती ना कधी होवो मना !

कां मुळीं कोणी करावें प्रेम एखाद्यावरी?
हें तुझें सौजन्य पाणी आणितें या लोचना

शक्तिच्या राज्यांत सक्ती शोभते, शोभो तिथें !
प्रीतिला स्वातंत्र्य आधी पाहिजे, कां होय ना?

आपुल्यामध्यें पडूं दे शैलराजी सह्य ही
भेटती दूरांतरे सप्रेम कृष्णा-कोयना !

चाललो एका दिशेनें थोडकें का हे असे?
सागरी एकाच भेटू अंतकाली मोहना !
गीत - माधव ज्युलियन
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
शैल - डोंगर, पर्वत.
शोभन - तेजस्वी, सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.