A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जेव्हां जेव्हां वाढायातें

जेव्हां जेव्हां वाढायातें । येइ सुभद्रा ती त्या यतितें ।
भुलुनि पाहुनि तद्रूपातें । तैसे नाना ढंग करी ॥

पंक्तीमध्यें नसतों जरि मी । भोळे तुम्हां पाहुनि नामी ।
भलतें भलतें करितीं स्वामी । निश्चयपूर्वक मज वाटे ॥