झरा प्रीतीचा का असा
          झरा प्रीतीचा का असा आटतो रे?
कशी काय बोलू गळा दाटतो रे !
तुझे लग्न झाले असे ऐकले मी
तुझे नाव तेव्हा दुरी टाकले मी
जिव्हाळा पुन्हा का तुझा वाटतो रे !
मिळे सागरासा पती त्या सतीला
मुळी डाग नाही तुझ्या इज्जतीला
उरी जाळ माझ्या उगा पेटतो रे !
जळे जीव जैसी वडी कापराची
अपेशी जिण्याला कळा ये धुराची
इमानास धोका कसा भेटतो रे !
          कशी काय बोलू गळा दाटतो रे !
तुझे लग्न झाले असे ऐकले मी
तुझे नाव तेव्हा दुरी टाकले मी
जिव्हाळा पुन्हा का तुझा वाटतो रे !
मिळे सागरासा पती त्या सतीला
मुळी डाग नाही तुझ्या इज्जतीला
उरी जाळ माझ्या उगा पेटतो रे !
जळे जीव जैसी वडी कापराची
अपेशी जिण्याला कळा ये धुराची
इमानास धोका कसा भेटतो रे !
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | 
| संगीत | - | वसंत पवार | 
| स्वर | - | सुमन कल्याणपूर | 
| चित्रपट | - | मल्हारी मार्तंड | 
| गीत प्रकार | - | चित्रगीत | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  











 सुमन कल्याणपूर