झुळूक आणखी एक
झुळूक आणखी एक,
आणखी एक पान गळले !
पानी फुलला सुमनी बहरला
माझ्या अंगणी जरी तरू वठला
शुष्क डहाळीत अंग मोडिती
कोंब नवे इवले !
चंद्रकोर अंगांगी भरली
दिन दिन कणकण उजळून खिरली
परि अवसेच्या प्रभात-ओटींत
सूर्यबिंब भरले !
खुशाल गळता, गळा दळांनो
हसत सरा माझिया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानझडीत मी
अक्षयपण उमले !
आणखी एक पान गळले !
पानी फुलला सुमनी बहरला
माझ्या अंगणी जरी तरू वठला
शुष्क डहाळीत अंग मोडिती
कोंब नवे इवले !
चंद्रकोर अंगांगी भरली
दिन दिन कणकण उजळून खिरली
परि अवसेच्या प्रभात-ओटींत
सूर्यबिंब भरले !
खुशाल गळता, गळा दळांनो
हसत सरा माझिया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानझडीत मी
अक्षयपण उमले !
गीत | - | वा. रा. कान्त |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | श्रीधर फडके |
गीत प्रकार | - | कविता |
खिरते | - | गळते, पाझरते. |