A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झुंजुरमुंजुर पाऊस मार्‍यानं

झुंजुरमुंजुर पाऊस मार्‍यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं
टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्याहिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये, साजणा !

ढगानं काळं निळं आभाळ आनंदलं
झाडाला पानाला, थेंब थेंब पाणी डसलं रं
ही झर झर झर गारगार सर
केसांच्या या जाळ्यामंदी आली रं
बेगिन ये, साजणा !

डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं
पिरतीनं धुंदीनं, अंग अंग माझं सजलं रं
मी पाण्यात भिजुन, इथं थिजुन
तुझ्यासाठी येडीपिशी झाले रं
बेगिन ये, साजणा !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.