जिवाचं मैतर तुम्ही माझ्या
जिवाचं मैतर तुम्ही माझ्या
चल चल सर्जा, चल राजा रे.
बाग-मळ्यांची दाटी रे
पिकती माणिकमोती रे
लवलव करिते हिरवळ रे
फुलली नाजूक मखमल रे.
दौलत ही न्यारी
फुलवित शेतकरी
त्यास उणे सारे
दुनियेचे वैभव रे.
मंगल घर अपुलं
गोकुळ गजबजलं
प्रीत इथे झुळझुळते
सुख-ममतेचं माहेर रे.
चल चल सर्जा, चल राजा रे.
बाग-मळ्यांची दाटी रे
पिकती माणिकमोती रे
लवलव करिते हिरवळ रे
फुलली नाजूक मखमल रे.
दौलत ही न्यारी
फुलवित शेतकरी
त्यास उणे सारे
दुनियेचे वैभव रे.
मंगल घर अपुलं
गोकुळ गजबजलं
प्रीत इथे झुळझुळते
सुख-ममतेचं माहेर रे.
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | मा. कृष्णराव |
स्वर | - | वसंत देसाई |
चित्रपट | - | शेजारी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |