जो आवडतो सर्वांला
जो आवडतो सर्वांला
तोचि आवडे देवाला
दीन भुकेला दिसता कोणी
घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी
फोडी पाझर पाषाणाला
घेउनी पंगु अपुल्या पाठी
आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी
देव अंथरी निज हृदयाला
जनसेवेचे बांधुन कंकण
त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृद्सिंहासन
नित् भजतो मानवतेला
तोचि आवडे देवाला
दीन भुकेला दिसता कोणी
घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी
फोडी पाझर पाषाणाला
घेउनी पंगु अपुल्या पाठी
आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी
देव अंथरी निज हृदयाला
जनसेवेचे बांधुन कंकण
त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृद्सिंहासन
नित् भजतो मानवतेला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | मिश्र मांड |
गीत प्रकार | - | भावगीत |
कंकण बांधणे | - | अंगिकृत गोष्टीचा अभिमान बाळगणे. |