A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जो भारतीय तो तो

जो भारतीय तो तो माझा स्वकीय आहे
मी भारतीय आहे

या भारतात माझ्या बहुसाल धर्म-जाती
गुंफी अनेकतेला ऐक्यात देशभक्ती
जो देशभक्त तो तो मज वंदनीय आहे
मी भारतीय आहे

नाना असोत भाषा, माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सद्विचार तो तो मज लक्षणीय आहे
मी भारतीय आहे

माझ्यावरील माझा विश्वास गाढ आहे
माझीच मातृभूमी विश्वात वाढ आहे
शांती जगात नांदो हे थोर ध्येय आहे
मी भारतीय आहे
बहुसाल - पुष्कळ (बहुसालपण- नाना प्रकार).
वाढ - मोठे होणे, उंच.
संपूर्ण कविता

जो भारतीय तो तो माझा स्वकीय आहे
मी भारतीय आहे

या भारतात माझ्या बहुसाल धर्म-जाती
गुंफी अनेकतेला ऐक्यात देशभक्ती
जो देशभक्त तो तो मज वंदनीय आहे
मी भारतीय आहे

नाना असोत भाषा, माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सद्विचार तो तो मज लक्षणीय आहे
मी भारतीय आहे

येथे समाजवादी दृढ लोकराज्य आहे
श्रमदान कष्ट घेतो, यज्ञात आद्य आहे
यज्ञात मानवांचे सुख प्रार्थनीय आहे
मी भारतीय आहे

माझ्यावरील माझा विश्वास गाढ आहे
माझीच मातृभूमी विश्वात वाढ आहे
शांती जगात नांदो हे थोर ध्येय आहे
मी भारतीय आहे

  संपूर्ण कविता / मूळ रचना