A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालों ।
तुमच्या उष्ट्यासाठीं आलों ॥२॥

चोखा ह्मणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठीं ॥३॥
जोहार - प्रणाम / शूद्रांनी करावयाचा रामराम.
मूळ रचना

जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला झालों । तुमच्या उष्ट्यासाठीं आलों ॥२॥
बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा ह्मणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठीं ॥४॥

संदर्भ-
संत चोखामेळा अभंगगाथा
सौजन्य- सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.