जुळल्या सुरेल तारा
जुळल्या सुरेल तारा, स्मरते अजून नाते
डोळ्यांत भाव माझे गाती तुझीच गीते
स्वप्नांपरी अजून ते दिवस भासतात
सरती उजाड रात्री हळुवार गीत गात
तो काळ आठविता नयनांत नीर दाटे
फिरलो मिळून दोघे गुंफुन हात हाती
फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद प्रीती
त्या कोवळ्या वयाला वरदान दिव्य होते
शब्दांत रंगविले मी भावस्वप्न भोळे
उरली न प्रीत अपुली हो बागही निराळे
त्या भाबड्या कळीला गीतांत अर्घ्य देते
डोळ्यांत भाव माझे गाती तुझीच गीते
स्वप्नांपरी अजून ते दिवस भासतात
सरती उजाड रात्री हळुवार गीत गात
तो काळ आठविता नयनांत नीर दाटे
फिरलो मिळून दोघे गुंफुन हात हाती
फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद प्रीती
त्या कोवळ्या वयाला वरदान दिव्य होते
शब्दांत रंगविले मी भावस्वप्न भोळे
उरली न प्रीत अपुली हो बागही निराळे
त्या भाबड्या कळीला गीतांत अर्घ्य देते
गीत | - | श्रीकांत पुरोहीत |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
अर्घ्य | - | पूजा / सन्मान. |