श्याम हे काय असे
श्याम हे काय असे मनचोरा?
इतरांसंगे रमसी गमसी, मला दाविसी तोरा..
मजसी माधवा धरिसी अबोला
मुखही मौन मुजोरा
शिवले जणू की ओठ तयांचा उचकटतो ना दोरा..
कधी न येसी घरी माझिया
काय तुझ्यावर जोरा?
रास खेळसी तिच्या अंगणी, नाचसी नंदकिशोरा..
अंगुली स्पर्शही नकोच माझा, तिचा ओढिसी बाहु
घुंघट ओढुनी तिला घालिसी, प्रेमदृष्टीने न्हाऊ
पदराचा माझिया श्रीधरा, नकोच तुजला वारा
प्रभु मीरेचा श्याम सावळा, फुलवी प्रेमफुलोरा..

गीत | - | राजा बढे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | बकुळ पंडित |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
Print option will come back soon