A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जुळत आली कथा

जुळत आली कथा, सिद्धी जाईल का?
जे हवे वाटते तेच होईल का?

चार डोळ्यांतल्या ओळखीच्या खुणा
उमगल्या ना तुला काय वेड्या मना
अर्थ मौनातला बोलीहुन बोलका

व्यर्थ शंका तुझी, व्यर्थ ही भीरुता
मजसी भासे दिसे चहूदिशी चारुता
भाग्यसमयी अशा पुसशि का नेमका
चारू - सुंदर.
भीरू - भित्रा.
ह्या गाण्यासाठी वाद्ये फार थोडी वापरली आहेत व संगीत फक्त व्हायोलिनवर घेतले आहे.

'निरंकुशः कवयः' असे जे म्हणतात ते काही खोटं नाही. ग दि माडगूळकरांचा या गीतांच्या रचना करताना कोणता मूड होता कोण जाणे? परंतु त्यांनी 'प्रीत शिकवा मला' या चित्रपटाच्या सर्वच रचना एकाच वृत्तामध्ये, म्हणजे कीर्तनकारांच्या आवडत्या 'झंपा' तालात केल्या व डावजेकरांच्या हाती ठेवल्या. सर्व गीतांचे वृत्त एकच !

दत्ता डावजेकरांना हे एक प्रकारचे आव्हानच होते. परंतु डावजेकरांनी या आव्हानाचा हसत हसत स्वीकार केला व बहुतेक गीते ही वेगवेगळ्या तालात बांधली. त्याच चित्रपटामधील हे एक मधुर गीत रेखा डावजेकर यांनी गायलेले !
(संपादित)

सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.