ज्यास देव सापडला
ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी
त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही
करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश
त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश
धूप वसंताचा तेथे दरवळून येई
दु:ख पाहुनी दुसर्याचे ज्याचे भरतात डोळे
डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले
अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होई
धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव
अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव
असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही
त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही
करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश
त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश
धूप वसंताचा तेथे दरवळून येई
दु:ख पाहुनी दुसर्याचे ज्याचे भरतात डोळे
डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले
अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होई
धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव
अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव
असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही
| गीत | - | प्रवीण दवणे |
| संगीत | - | केदार पंडित |
| स्वर | - | पं. संजीव अभ्यंकर |
| अल्बम | - | जीवनरंग |
| गीत प्रकार | - | प्रार्थना |
| गाभारा | - | देवालयात देवाची मूर्ती असते तो अंतर्भाग. |
| ठाय | - | स्थान, ठिकाण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












पं. संजीव अभ्यंकर