कां अशी अकारण हसशी
कां अशी अकारण हसशी सखि अपुल्याशी?
कळशीतिल जळ कां खिदळे तव हृदयाशी?
घट एक भराया लागे कां ग घटका?
कां उतावळीचा भाव दाविशी लटका?
कटिं असुनी घट हे केविं मुखावर पाणी?
कां भिजलें कुंकू चमके सूर्यावाणी?
डोळ्यांत गहनता कोठिल ही घननीळ?
गात्रांत कुणाची घुमते अजुनी शीळ?
जाताना होतिस कलिका नाजुक पोर
घटकेंत फुलापरि झालिस केवीं थोर?
रवि असा कोणता उगवे सायंकाळीं
कर शिवतां ज्याचे ये जीवास नव्हाळी?
का अर्घ्यचि अर्धे जीवन त्याला दिधलें?
अन् हास्यें त्याच्या उरलें सुरलें भरिलें
कळशीतिल जळ कां खिदळे तव हृदयाशी?
घट एक भराया लागे कां ग घटका?
कां उतावळीचा भाव दाविशी लटका?
कटिं असुनी घट हे केविं मुखावर पाणी?
कां भिजलें कुंकू चमके सूर्यावाणी?
डोळ्यांत गहनता कोठिल ही घननीळ?
गात्रांत कुणाची घुमते अजुनी शीळ?
जाताना होतिस कलिका नाजुक पोर
घटकेंत फुलापरि झालिस केवीं थोर?
रवि असा कोणता उगवे सायंकाळीं
कर शिवतां ज्याचे ये जीवास नव्हाळी?
का अर्घ्यचि अर्धे जीवन त्याला दिधलें?
अन् हास्यें त्याच्या उरलें सुरलें भरिलें
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | |
स्वर | - | बबनराव नावडीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १७ फेब्रुवारी १९३८. |