का चिंता करिसी प्राण्या
का चिंता करिसी प्राण्या का चिंता करिसी
नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करिसी
दो पायावर रचतो सुंदर देहाचे जो मंगल देऊळ
तोच चालवी अपुले पाऊल का मागे बघसी
घर हे सुटता नाते तुटता जगही झाले जरी पारखे
सुखदु:खही रे तुला सारखे का डोळे पुससी
चंद्र हासरा गोड मुखाचा रसाळ वाणी अमृताची
प्रेमळ दृष्टी तुझ्या मनाची देव तुझ्यापाशी

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
चित्रपट | - | शिकलेली बायको |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
Print option will come back soon