का हासला किनारा
          का हासला किनारा पाहून धुंद लाट
पाहूनिया नभाला का हासली पहाट?
होती समोर माया, गंभीर सागराची
संगीत मर्मराचे, किलबिल पाखरांची
काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ !
चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात !
          पाहूनिया नभाला का हासली पहाट?
होती समोर माया, गंभीर सागराची
संगीत मर्मराचे, किलबिल पाखरांची
काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ !
चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात !
| गीत | - | जगदीश खेबूडकर | 
| संगीत | - | अनिल-अरुण | 
| स्वराविष्कार | - | ∙ अनुराधा पौडवाल ∙ शोभा जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) | 
| गीत प्रकार | - | भावगीत | 
| टीप - • काव्य रचना- ९ जुलै १९९१. | 
| मर्मर | - | एक पक्षी. (Hummingbird). | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !