काय करू मी बोला
काय करू मी बोला
घरी पाळणा सुना
नवनवसाचा बाळ माझा येईल का हो पुन्हा?
जीवापाड मी होते जपले
हसर्या मुखीचे अमृत प्याले
चिमणे अश्रु पटपट टिपले,
चुकुनी स्वप्नी कधि न बोलले एकही शब्द उणा
काळजात या घरे पाडुनी
घरभर फिरती गोड आठवणी
व्याकुळ होउनि उरी कवळुनी
चुंबित माया खेळ खेळणी, फुटतो मज पान्हा
सुख माझे ते मुठीत इवले
देवा का रे नाही बघवले
पोटी घालुनि तुवाच नेले
जन्मीचे मज शासन घडले, माझा काय गुन्हा?
घरी पाळणा सुना
नवनवसाचा बाळ माझा येईल का हो पुन्हा?
जीवापाड मी होते जपले
हसर्या मुखीचे अमृत प्याले
चिमणे अश्रु पटपट टिपले,
चुकुनी स्वप्नी कधि न बोलले एकही शब्द उणा
काळजात या घरे पाडुनी
घरभर फिरती गोड आठवणी
व्याकुळ होउनि उरी कवळुनी
चुंबित माया खेळ खेळणी, फुटतो मज पान्हा
सुख माझे ते मुठीत इवले
देवा का रे नाही बघवले
पोटी घालुनि तुवाच नेले
जन्मीचे मज शासन घडले, माझा काय गुन्हा?
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | भावगीत |