A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय वधिन मी ती सुमती

काय वधिन मी ती सुमती ।
नवयुवती अबला, साश्रुलोचना, धरुनि कुरलकुंतल या हातीं ॥

कोमल कुसुमित लता कधींही ।
लववुनि कुसुमें खुडिलीं नाहीं । आजवरी तीं ॥