कधी अचानक सांग सखे
कधी अचानक सांग सखे तू स्वप्नीं माझ्या येशील का?
इंद्रधनूचे सात रंगही नभात उधळून देशील का?
श्रावणमासी सरसर धारा, टपटप गारा होशील का?
उधाण वारा, मोरपिसारा, फुलवून कळी तू येशील का?
कधी किनारी रूपकेशरी लाजलाजरी होशील का?
अवतीभवती मिटले डोळे सांग बावरी होशील का?
कधी न पाहिली तुला परंतु भास तुझे होती मज का?
सतत तुझी ही चाहूल मजला येत राहते पुन्हा पुन्हा का?

गीत | - | विनय सावंत |
संगीत | - | संदेश कदम |
स्वर | - | अमोल बावडेकर |
गीत प्रकार | - | भावगीत |