कधी कुठे न भेटणार
कधी कुठे न भेटणार;
कधि न कांहि बोलणार;
कधी कधी न अक्षरांत
मन माझें ओवणार.
निखळे कधि अश्रु एक,
ज्यांत तुझें बिंब दिसे;
निखळे निःश्वास एक,
ज्यांत तुझी याद असे
पण तिथेच, तें तिथेच
मिटुन ओठ संपणार;
व्रत कठोर हें असेंच,
हें असेंच चालणार
कधि न कांहि बोलणार;
कधी कधी न अक्षरांत
मन माझें ओवणार.
निखळे कधि अश्रु एक,
ज्यांत तुझें बिंब दिसे;
निखळे निःश्वास एक,
ज्यांत तुझी याद असे
पण तिथेच, तें तिथेच
मिटुन ओठ संपणार;
व्रत कठोर हें असेंच,
हें असेंच चालणार
| गीत | - | इंदिरा संत |
| संगीत | - | गजानन वाटवे |
| स्वर | - | रंजना जोगळेकर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












रंजना जोगळेकर