A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कधी ऊन तर कधी सावली

कधी ऊन तर कधी सावली, खेळ असा हा घडे

आज विषाचा प्याला देई, दैव तुझ्या हाती
डोळे मिटुनी घोट घ्यावया लाव असा ओठी
भगवंताने दिले भोग हे, भोगून जा तू पुढे

काट्यांमधुनी वाट काढिता रक्त ठिबकते पायी
तरी संकटी निर्धाराने अशी उभी तू राही
धागा तुटला, पतंग तरी हा वार्‍यावरती उडे

सीतेच्या पदरात मिळाली वनवासाची ओटी
तीने अश्रूंचे अमृत पाजून अंकुर जपले पोटी
असेच असते जिणे सतीचे, दु:खाच्या पलीकडे
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- मन्‍ना डे
चित्रपट - पाहुणी
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.