कधी सांजवेळी मला आठवुनी
कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी
पाहशील का?
तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा
वाहशील का?
रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का?
तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी, तशी तू मलाही-
साहशील का?
तुझ्या भोवताली जराशी वळुनी
पाहशील का?
तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा
वाहशील का?
रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का?
तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी, तशी तू मलाही-
साहशील का?
| गीत | - | सौमित्र |
| संगीत | - | मिलिंद इंगळे |
| स्वर | - | मिलिंद इंगळे |
| अल्बम | - | सांजगारवा |
| गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












मिलिंद इंगळे