कधींतरी कुठेंतरी फिरून
कधींतरी कुठेंतरी फिरून भेटशील का?
अनोळखी मुशाफरा हसून बोलशील का?
पाहिलें पुन्हां पुन्हां
झाकला तुझा गुन्हा
लाजेची नजरझुंज लपुन खेळशील का?
जीभ का जडावली?
जाशि परत पाउली
जातांना एकदां वळून पाहशील का?
या मनांतली छबी
या इथेंच की उभी
ओढ लागली तुझी, कळून हासशील का?
अनोळखी मुशाफरा हसून बोलशील का?
पाहिलें पुन्हां पुन्हां
झाकला तुझा गुन्हा
लाजेची नजरझुंज लपुन खेळशील का?
जीभ का जडावली?
जाशि परत पाउली
जातांना एकदां वळून पाहशील का?
या मनांतली छबी
या इथेंच की उभी
ओढ लागली तुझी, कळून हासशील का?
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | डी. पी. कोरगावकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | गळ्याची शपथ |
गीत प्रकार | - | चित्रगीत |