कधी तू रिमझिम झरणारी
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यांत
कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यांत
कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू चमचम करणारी चांदण्यांत
कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यांत
कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
गीत | - | श्रीरंग गोडबोले |
संगीत | - | अविनाश-विश्वजीत |
स्वर | - | हृषिकेश रानडे |
चित्रपट | - | मुंबई-पुणे-मुंबई |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, चित्रगीत |
मृगजळ | - | आभास. |