कधीतरी तुम्ही यावे इथे
          कधीतरी तुम्ही यावे
इथे या घरात
कैक दिवस होता हेतू असा अंतरात
शपथ तुमची !
आज भाग्य आले हाती
तरी उरी वाटे भीती
मनातले हितगूज सारे राहिले मनात
शपथ तुमची !
जीव बावरे हा भोळा
नीर दाटू पाहे डोळा
बोल बोल ओठावरचा विरघळे मुखात
शपथ तुमची !
मनी गुंफिलेल्या ओळी
ओघळल्या ऐत्यावेळी
सूर मात्र केवळ उरले गीत गायनात
शपथ तुमची !
शपथ तुम्हा तुमची देवा
मूक भाव जाणून घ्यावा
पुन्हा नका लोटू मजसी स्वप्न चिंतनात
शपथ तुमची !
          इथे या घरात
कैक दिवस होता हेतू असा अंतरात
शपथ तुमची !
आज भाग्य आले हाती
तरी उरी वाटे भीती
मनातले हितगूज सारे राहिले मनात
शपथ तुमची !
जीव बावरे हा भोळा
नीर दाटू पाहे डोळा
बोल बोल ओठावरचा विरघळे मुखात
शपथ तुमची !
मनी गुंफिलेल्या ओळी
ओघळल्या ऐत्यावेळी
सूर मात्र केवळ उरले गीत गायनात
शपथ तुमची !
शपथ तुम्हा तुमची देवा
मूक भाव जाणून घ्यावा
पुन्हा नका लोटू मजसी स्वप्न चिंतनात
शपथ तुमची !
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | 
| संगीत | - | सुधीर फडके | 
| स्वर | - | आशा भोसले | 
| चित्रपट | - | गरिबाघरची लेक | 
| गीत प्रकार | - | चित्रगीत | 
| हितगूज | - | हिताची गुप्त गोष्ट. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !