A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कळले नाही कधी उसवले

कळले नाही कधी उसवले
लक्तर जगण्याचे
गेले फाटून उडण्याआधी
पतंग स्वप्‍नांचे
नशिबी आली फरपट माझ्या
कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी तू
ही पुन्हा दिनरात

चुकली सारी गणिते केवळ
शून्य उरे हाती
उडूनी गेली वर्षे, झाली-
जन्माची माती
पसार झाली नाती सगळी
सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी तू
ही पुन्हा दिनरात

जाती भावना जळुनी जेव्हा
व्यवहारी जग छळते
गुंता होतो ह्या जगण्याचा अन्‌
नियती भेसूर हसते
चुकले कोठे कळण्याआधी
होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी तू
ही पुन्हा दिनरात
गीत- गुरु ठाकूर
संगीत - अजित-अतुल-समीर
स्वर - अजित परब
चित्रपट- शिक्षणाच्या आयचा घो !
गीत प्रकार - चित्रगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  अजित परब