A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कळ्यांचे दिवस फुलांच्या

कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
येती नि जाती, येती नि जाती !

नवल असे घडते काही
स्वप्‍नात स्वप्‍न पडते बाई
सख्याचा स्पर्श, अनोखा हर्ष
प्रीतीच्या सारिका मंजुळ मंजुळ गाती !

वार्‍याची झुळुक झुलता झुला
क्षणात उंच नेतसे मला
सांजेचे रंग, धुंद तरंग
पाचही प्राण सुखात सुखात न्हाती !
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - मिलिंद जोशी
स्वर- मनिषा जोशी
अल्बम - रंग नवा
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.