कामापुरता मामा
कामापुरता मामा, ताकापुरती आजी
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी
मित्र म्हणोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना
तुटून पडते नाण्यांवरती सारी वानरसेना
तोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी
पैशावाचुन वैद्य बघेना पिडलेल्यांची नाडी
लग्नाआधी जावई मागे जागा संसाराला
पैशावाचुन फुटे न अंकुर प्रेमाच्या बीजाला
नाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची
काका मामा बंधु भगिनी सगळी हो स्वार्थाची
पैसा असता मानमरातब, सलाम करतिल सारे
अधनावस्था पाहून म्हणतील 'दूर निघोनी जा रे'
हात करावा ओला, तेव्हा पुढचं बोला
गरिबांसाठी येथे काठी, त्याला कुणीही टोला
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी
मित्र म्हणोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना
तुटून पडते नाण्यांवरती सारी वानरसेना
तोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी
पैशावाचुन वैद्य बघेना पिडलेल्यांची नाडी
लग्नाआधी जावई मागे जागा संसाराला
पैशावाचुन फुटे न अंकुर प्रेमाच्या बीजाला
नाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची
काका मामा बंधु भगिनी सगळी हो स्वार्थाची
पैसा असता मानमरातब, सलाम करतिल सारे
अधनावस्था पाहून म्हणतील 'दूर निघोनी जा रे'
हात करावा ओला, तेव्हा पुढचं बोला
गरिबांसाठी येथे काठी, त्याला कुणीही टोला
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | कृष्णा कल्ले, सुधीर फडके |
चित्रपट | - | कामापुरता मामा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
चहाडी | - | चुगली, लावालावी. |