A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पावना वामना या मना

पावना वामना या मना ।
दे तव भजनीं निरंतर वासना ॥

श्रीवत्सांकित कौस्तुभधारिन्‌ ।
योगीजनांतररंजना ॥

भो प्रह्लादपरा हरिरूपा ।
मत्तनिशाचरकंदना ॥

नवतुलसीदलमालाभूषी ।
बलवद्भवभयभंजना ॥
गीत- अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार - पं. वसंतराव देशपांडे
अनंत वेलणकर
रामदास कामत
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत सौभद्र
राग- पिलू
चाल-गर्भाच्या चालीवर
गीत प्रकार - नाट्यगीत
मत्त - माजलेला, दांडगा.

 

  पं. वसंतराव देशपांडे
  अनंत वेलणकर
  रामदास कामत