A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कमोदिनी काय जाणे

कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

तैसें तुज ठावें नाही तुझें नाम ।
आह्मी च तें प्रेमसुख जाणों ॥२॥

माते तृण बाळा दुधाचि ते गोडी ।
ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥

तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं ।
नाही त्याची भेटी भोग तीये ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - संतवाणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.