A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल ।
कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥

कानडा विठ्ठल नामें बरवा ।
कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥

कानडा विठ्ठल रूपे सांवळा ।
कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥

कानडा विठ्ठल चंद्रभागें तटीं ।
कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥

कानडा विठ्ठल कानडा बोले ।
कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥

वेधियेलें मन कानड्यानें माझें ।
एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥
कानडा - वेडावाकडा / दुर्बोध / कर्नाटकी / एक राग.
बरवा - सुंदर / छान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  किशोरी आमोणकर, पं. रघुनंदन पणशीकर