A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कंठ आणि आभाळ दाटून येती

कंठ आणि आभाळ दाटून येती
आणि कोसळती.. सरीवर सरी!

पहिल्या उन्हाची हळद ओली होती
फांदीवर पाने जन्म घेत होती
भवताल त्यांना अजून ठाऊक नव्हता
अशा वेळी आल्या.. सरीवर सरी!
आणि कोसळल्या.. सरीवर सरी!

आता कुठे नुकतेच पंख लांब केले
आता कुठे घरट्यातून फांदीवर आले
आभाळ या पिलांचे खूप लांब आहे
अशा वेळी आल्या.. सरीवर सरी!
आणि कोसळल्या.. सरीवर सरी!

उधाण आहे आकाश पेलताना
उभ्या जन्माचा पाऊस झेलताना
स्वत:चे स्वत:शी लढणे दिनरात आहे
अशा वेळी आल्या.. सरीवर सरी!
आणि कोसळल्या.. सरीवर सरी!

 

  शंकर महादेवन, हरिहरन