कर आता गाई गाई
कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई?
बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकूल !
काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव?
नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का?
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई?
बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकूल !
काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव?
नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | सुषमा श्रेष्ठ |
गीत प्रकार | - | बालगीत |
उतरंड | - | खाली मोठे व वर लहान भांडे ठेऊन केलेली रचना. |
बागुल (बागुलबोवा) | - | लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी केलेला पुतळा अथवा घेतलेले सोंग. |
बोळके | - | मातीचे छोटे भांडे. |
Print option will come back soon