A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करितां विचार सांपडलें

करितां विचार सांपडलें वर्म ।
समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥

मज घेऊनिया आपणांसी द्यावें ।
साटी जीवें जीवें नारायणा ॥२॥

उरी नाहीं मग पडदा कां आला ।
स्वमुखेंचि भला करितां वाद ॥३॥

तुका ह्मणे माझें खरें देणें घेणें ।
तुह्मी साक्षी जाणें अंतरीचें ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - अनिल-अरुण
स्वर- प्रभाकर कारेकर
गीत प्रकार - संतवाणी
निश्रम - अथक श्रम.
वर्म - दोष, उणेपणा / खूण.
साटी - बरोबरी, सारखेपणा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.