A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करिते जीवनाची भैरवी

सीमा झाली सोसण्याची, परि दुःख संपले नाही
करिते जीवनाची भैरवी!

हे काय जिणे नित दुःख पिणे, रडतारडता सुख भासविणे
नाती फिरली, प्रीती फिरली, माझे कुणी उरले नाही!

मज तार अता, वा मार अता, मन बावरले तनु सावरता
ही काय दशा, हे परमेशा, ये धावुनिया लवलाही!
गीत- यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले
चित्रपट- झाले गेले विसरून जा
गीत प्रकार - चित्रगीत
लवलाही - लवकर.