A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करुया उदो उदो उदो

अंबाबाईचा उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
घेउया लाभ दर्शनाचा, उदो उदो !

सार्‍या जनतेची आई, माता अंबाबाई
हाकेला उभी राही, सारं काही तीच्या ठायी
सत्य डोळ्यांनी पाही, दंड दुष्टांना देई
अनेक रूपे तीही घेई भक्तांच्या पायी
आश्विनी प्रथम दिनी, बसते सिंहासनी
होतो जयघोष माउलीचा, उदो उदो !

तेथुनी जरा दुरी स्वामीची गगनगिरी
अंश तो परमेश्वरी, भक्ती दत्ताची खरी
गुहेत स्थान जरी, बाजुला खोल दरी
रूप ते त्यांचे जणू शिवशंकरापरी
भेटुया त्यांना चला पाहु ईश्वरी लीला
भरे दरबार भाविकांचा, उदो उदो !

डोंगरी माथ्यावर जोतिबांचे मंदिर
जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर
असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार
करिती देवींचा तो उत्सव घरोघर
सोहळा मनोहर, रम्य तो खरोखर
सुटे मधुगंध चंदनाचा, उदो उदो !