शिक एकदा खरेच प्रीत
शिक एकदा खरेच प्रीत तू करायला
हृदय लागले तुझे कधीच दरवळायला
पापण्यांवरी तुझ्या फुले अनेक डवरली
लोचनांतुनी सुगंध लागला झरायला
चांदणे टिपूर सांडले तुझे सभोवती
अन् चकोर बघ तुझाच लागला झुरायला
हा वसंत ही फुले, क्षणैक हा ऋतू सखे
बहर आजचा उद्या मिळेल का बघायला?
चंद्र पौर्णिमेत आज, रात्र पौर्णिमेतली
हीच वेळ चांदण्यात जायची भिजायला
हृदय लागले तुझे कधीच दरवळायला
पापण्यांवरी तुझ्या फुले अनेक डवरली
लोचनांतुनी सुगंध लागला झरायला
चांदणे टिपूर सांडले तुझे सभोवती
अन् चकोर बघ तुझाच लागला झुरायला
हा वसंत ही फुले, क्षणैक हा ऋतू सखे
बहर आजचा उद्या मिळेल का बघायला?
चंद्र पौर्णिमेत आज, रात्र पौर्णिमेतली
हीच वेळ चांदण्यात जायची भिजायला
गीत | - | इलाही जमादार |
संगीत | - | हर्षित अभिराज |
स्वर | - | एस्. पी. बालसुब्रमण्यम |
अल्बम | - | निशिगंध |
गीत प्रकार | - | भावगीत |
चकोर | - | चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी. |