कसा ग विसरू तो सोहळा
क्षणाभोवती त्याच रंगतो अजून जीव खुळा
कसा ग विसरू तो सोहळा?
नजरभेट ती वीजबावरी
मनात घुमली धुंद बासरी
मिटल्या ओठांतुनी मनातिल गंध फुलू लागला
झुकता खाली तुझी पापणी
हसली मेघांतुनी चांदणी
तुझ्या तनूवर मोरपिसारा मोहरून आला
घडून गेली क्षणांत किमया
ही मदनाची मंथर माया
बहरधुंद त्या स्वप्नघडीला चंद्र फितुर झाला
कसा ग विसरू तो सोहळा?
नजरभेट ती वीजबावरी
मनात घुमली धुंद बासरी
मिटल्या ओठांतुनी मनातिल गंध फुलू लागला
झुकता खाली तुझी पापणी
हसली मेघांतुनी चांदणी
तुझ्या तनूवर मोरपिसारा मोहरून आला
घडून गेली क्षणांत किमया
ही मदनाची मंथर माया
बहरधुंद त्या स्वप्नघडीला चंद्र फितुर झाला
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | सुधीर फडके |
गीत प्रकार | - | भावगीत |
मंथर | - | मंद, हळू चालणारा. |