कसं काय पाटील बरं
कसं काय पाटील बरं हाय का?
काल काय ऐकलं ते खरं हाय का?
काल म्हणं तुम्ही जत्रंला गेला, तमाशात काळिज इसरून आला
इसरल्या ठायी गावलं का न्हाई, आज तरी संगती आणलंय का?
काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला, कमरंचा ऐवज हरवून आला
केली वाटमारी सांजच्यापारी, आज काय शिल्लक र्हायलंय का?
काल म्हनं तुम्ही इथंतिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला
काय झालं पुढं सांगा तरी थोडं, खाली नका बघु आता लाजताय का?

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | सवाल माझा ऐका |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |